दोघा पोलिसांनी धमकावून खंडणी उकळली
सार्वमत

दोघा पोलिसांनी धमकावून खंडणी उकळली

खरवंडीच्या युवकाची तक्रार

Arvind Arkhade

खरवंडी|वार्ताहर| Kharwandi

भाडोत्री पिकअप मधून नगरला धान्य विकण्यासाठी घेवून जात असताना शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचार्‍यांनी रस्त्यात अडवून हे धान्य रेशनचे असल्याचे सिद्ध करु शकतो ते महागात पडेल असे धमकावून ऐंशी हजाराची खंडणी उकळल्याचा तक्रार खरवंडी येथील महाविद्यालयीन युवकाने राज्याच्या गृह सचिवांकडे केली आहे.

याबाबत वैभव विलास उगले याने निवेदनात म्हटले की, मी वडिलांना किराणा दुकानात मदत करत असतो. लोक किराणा सामान खरेदीच्या बदल्यात धान्य, कडधान्य तेलबिया देत असतात. या माध्यमातून जमा झालेले धान्य नगरच्या आडते व्यापार्‍याला विकून त्याची रोख रक्कम करायची असा पुर्वापार व्यवहार चालत आला आहे.

8 जुलै रोजी धान्य गोण्यांत भरुन भाडोत्री पिकअपद्वारे धान्य घेवून जात असताना शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांनी वाहन अडवून ते निर्जनस्थळी घेण्यास भाग पाडले. तेथे कर्मचार्‍याने गाडीची चावी व मोबाईल हिसकावून घेतला व वडिलांना फोन करुन धमकावून खंडणी मागितली. त्यावर त्या पोलिसाला गुगल पे द्वारे 80 हजाराची रक्कम देण्यात आली.

दरम्यान याबाबत चौकशी करुन संबंधीत पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com