नगरमध्ये पोलिसांचे कल्याण मटका जुगारावर छापे

पाच जणांविरूद्ध गुन्हा
नगरमध्ये पोलिसांचे कल्याण मटका जुगारावर छापे

अहमदनगर|Ahmedagar

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने छापे टाकले. या छाप्यादरम्यान रोख रक्कम व जुगार साहित्य असा 12 हजार 690 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. दोघे पसार झाले आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदा कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती अप्पर अधीक्षक डॉ. राठोड यांना मिळाली होती. मिळालेल्या महिती नुसार त्यांनी विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सुरूवातील बोल्हेगावातील आंबेडकर चौकात सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. याठिकाणी सुभाष वामन थोरात (वय- 40 रा. रेणूकानगर), प्रशांत सुरेश झावरे (वय- 30 रा. साईनगर) हे दोघे जुगार खेळताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 11 हजार 270 रूपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक केली. तर बजरंग मामा (पूर्ण नाव माहिती नाही) हा पसार झाला. पथकाने दुसरा छापा सह्याद्री चौकात टाकला. नदिम इब्राहिम शेख (वय- 35 रा. सह्यादी चौक, एमआयडीसी) हा जुगार खेळताना मिळून आला पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून 1 हजार 420 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर निलेश भाकरे हा पसार झाला. विशेष पथकातील उपनिरीक्षक सुनील सुर्यवंशी, पोलीस कर्मचारी अरविंद भिंगारदिवे, राजू चव्हाण, संभाजी घोडे, विनोद पवार, दिलीप गायकवाड यांनी ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com