संगमनेरात दारु अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

5 लाख 40 हजाराचा माल जप्त, पाच जणांविरुद्ध गुन्हा
संगमनेरात दारु अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

संगमनेर (शहर प्रतिनिधी) -विना परवाना देशी दारूची वाहतूक व विक्री केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच ठिकाणी सुरु असलेल्या बेकादेशीर दारूच्या अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये 5 लाख 39 हजार 892 रुपयांचा माल जप्त केला असून याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील गुंजाळवाडी, राजापूर, समनापूर, देवगाव व खराडी येथे ही कार्यवाही करण्यात आली. गुंजाळवाडी येथील अरगडे मळ्यात 5 लाख 22 हजार 496 रूपयाचा माल जप्त केला असून त्यामध्ये 4 चाकी गाडीसह आरोपी रामदास सूर्यभान रोहम यास ताब्यात घेण्यात आले. दुसर्‍या घटनेत राजापूर येथील राजू पिंपळे हा 24 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाडाचे आडोशाला दारू विक्री करताना आढळला. त्याच्याकडे 8,100 रु. कि. चे त्यात 30 लि. गावठी हातभट्टीची तयार दारू, 100 लि.कच्चे रसायन व दारू बनविण्याचे साहित्य मिळाले.

देवगांव येथील कारवाईत राजहंस रतन शिंदे (वय 53 रा. देवगाव) हा घराच्या आडोशाला देवगाव येथे 5,500 रुपये विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला. समनापूर येथील चौथ्या कार्यवाहीत 1,300 ची देशी दारू जप्त केली असून आरोपी फरार आहे. शौकत आयुब शेख (रा. समनापुर) येथे 25 मे 2021 रोजी 8 वाजता हॉटेल नाशिबच्या पाठीमागे कार्यवाही करण्या आगोदर फरार झाला. या कार्यवाहीत 1,300 रुपये किमतीच्या 50 देशी बाबी संत्रा दारूच्या बाटल्या 90 मिली प्रत्येकी 26 रुपये दराप्रमाणे जप्त केल्या.

खराडी गावात 2 हजार 496 चा माल जप्त केला असून अर्जुन भागाजी पवार हा आरोपी फरार झाला आहे. शहर पोलिसांनी केलेल्या पाच कारवाईमध्ये एका आरोपीला ताब्यात घेतले असून चार आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com