जोगेश्‍वरी आखाडा येथील हॉटेलवर छापा

जोगेश्‍वरी आखाडा येथील हॉटेलवर छापा

राहुरी (प्रतिनिधी) - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राहुरी तालुक्यात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत काही हॉटेल व ढाबामालक चोरून लपून दारूविक्री करत आहेत. दि. 19 मे रोजी शहरहद्दीतील न्यू काका ढाबा याठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे पाच हजार रुपयांची दारू जप्त करून कारवाई केली.

राहुरी पोलीस ठाणे हद्दीत जोगेश्‍वरी आखाडा परिसरात नगर-मनमाड राज्य महामार्गावर न्यू काका ढाबा या ठिकाणी दि. 19 मे रोजी रात्री आठ वाजे दरम्यान पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्याठिकाणी अवैधरित्या चोरून लपून दारू विक्री सुरू होती. पोलीस प्रशासनाने कारवाई करत 5,320 रुपयांची देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.

पोलीस हवालदार आजिनाथ पाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी सुनील सुखदेव घुले याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. व कलम - ॥। 383/2021 मुंबई पोलीस कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com