हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा, 3 अटकेत

हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा, 3 अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी) :

पोलिसांनी एकाचवेळी दोन ठिकाणी वेश्या व्यवसायावर छापा टाकून 3 परप्रांतीय महिलांची सुटका केली आहे. या कारवाईत 3 पंटरांना अटक करण्यात आली आहे. शहरातील वाणी नगर आणि केडगाव परिसरातील अंबिका नगर येथे ही कारवाई करण्यात आली.

नगर शहर पोलीस दलात रूजू झालेले पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना शहरात दोन ठिकाणी प्रोफाईल सेक्स रॅकेट वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेट उध्वस्त केले. उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय चालवला जात होता.

तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील वाणी नगर येथे करण्यात आलेल्या कारवाईत एका परप्रांतीय पिडीत महिलांची सुटका करण्यात आली. पोलीस निरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक एकनाथ लांडगे (वय 30) व सागर जाधव या दोघांविरूद्ध स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तर अंबिका नगर (केडगाव) छापा टाकून 2 पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली. पोलीस नाईक शाहिद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पोपट ओव्हाळ (रा. माळीवाडा) याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ.सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात डीवायएसपी संदीप मिटके , संपत शिंदे, गडकरी, समाधान सोळंकी, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, तरटे, अमोल शिरसाट, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, जयश्री सुद्रिक, प्रियंका भिंगरदिवे यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com