पोलिसांचे सहा ठिकाणी हातभट्टीवर छापे

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त: आठ जणांविरूध्द गुन्हे
पोलिसांचे सहा ठिकाणी हातभट्टीवर छापे

अहमदनगर|Ahmedagar

नगर तालुक्यात गावठी हातभट्टी दारू (Gavthi Alcohol) अड्ड्यांचा सुळसुळाट झाला आहे. रविवारी नगर तालुका पोलिसांनी (Nagar Taluka Police) सहा गावातील हातभट्टी अड्डे उध्दवस्त केले. यामध्ये एक लाख 88 हजार रूपयांची दारू, कच्चे रसायन जप्त (Seized) करून नष्ट केले आहे. आठ हातभट्टी चालकांविरूध्द तालुका पोलीस ठाण्यात (Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मच्छिंद्र उर्फ रवी लहानू पवार (रा. साकत ता. नगर), रेहमान बाबु शेख (रा. खांडके ता. नगर), अनिल नानाभाऊ पवार (रा. वाळकी ता. नगर), गणेश गोरख चौगुले (रा. चौगुले वस्ती, नेप्ती ता. नगर), दिलीप नाथू पवार (रा. नेप्ती), विलास हिरामण पवार (रा. धोंडेवाडी ता. नगर), नाना हरी पवार (रा. साकत), अशोक हिरामण गव्हाणे (रा. सोनेवाडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या हातभट्टी चालकांची नावे आहेत.

नगर तालुका पोलीस ठाण्याच्या (Nagar Taluka Police Station) हद्दीमध्ये नेप्ती, वाळकी, साकत, सोनेवाडी, धोंडेवाडी, खांडके या गावांमध्ये गावठी हातभट्टी निर्मिती केली जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर ग्रामीण) अजित पाटील, निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक बोराडे, पोलीस अंमलदार गणेश लबडे, विक्रांत भालसिंग, सोमनाथ घावटे, सचिन वनवे, रमेश शिंदे, भास्कर लबडे, बापू गव्हाणे, राहुल शिंदे, भरत धुमाळ, जगदीश जंबे, शैलेंद्र सरोदे, गोरे, धर्मराज दहिफळे, रमेश गांगर्डे यांनी सदरची कारवाई केली.

पुन्हा पुन्हा हातभट्टीची निर्मिती

नगर तालुक्यात यापूर्वी देखील अनेक गावांमध्ये स्थानिक गुन्हे शाखा व नगर तालुका पोलिसांनी कारवाई करून गावठी हातभट्टी दारू अड्डे उध्दवस्त केले आहेत. कारवाई होऊन देखील पुन्हा तेच लोक हातभट्टी दारूची निर्मिती करून त्याची विक्री करतात. पुन्हा पुन्हा दारू विक्रेचे गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तीविरूध्द प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

Related Stories

No stories found.