सोनेवाडीत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 46 हजारांची दारू जप्त

सोनेवाडीत गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 46 हजारांची दारू जप्त

शिर्डी (शहर प्रतिनिधी) / Shirdi - राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे गावठी दारुच्या अड्ड्यांवर धाड टाकून 46 हजार रुपयांची गावठी हातभट्टी दारू बनविण्याची सामुग्री आणि तयार हातभट्टीची गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आणि शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथेक काल शनिवार दि. 17 रोजी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला आहे. सदरची कारवाई उपविभागीय जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपवते यांनी पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देवरे, पो.ना. प्रशांत दिनकर, पोना शाम जाधव, पो.कॉ. रिजवान शेख, पोकॉ अजय अंधारे यांचे पथक बनवून तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग नितेश शेंडे उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क , इतर अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधून करण्याचे आदेश दिले होते.

त्यावरून या पथकाने सोनेवाडी येथे जाऊन कमल ताराचंद वायकर वय- 50 वर्षे रा. सोनेवाडी व एक अज्ञात इसम यांच्या दारू बनविण्याच्या भट्टीवर व अड्ड्यावर छापे टाकून त्यांचेकडील 46 हजार रुपयांंची गावठी दारू बनविण्याचे साधन सामुग्रीसह तयार गावठी हातभट्टीची दारू जप्त करून त्यातून गुन्ह्याचे तपासकामी सॅम्पल घेऊन उर्वरीत माल जागेवर नष्ट केला.

यावेळी महिला आरोपी कमल ताराचंद वायकर वय- 50 वर्षे रा.सोनेवाडी हिचेविरुध्द राज्य उत्पादन शुल्क विभाग कोपरगाव 1 बाभळेश्‍वर ता.राहाता गुरनं. 101/2021 मु.प्रो.अ‍ॅक्ट कलम 65 ( ई ) प्रमाणे कारवाई करून त्यास अटक करण्यात आली आहे. तसेच यातील अज्ञात इसम याचेविरुध्द निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक 2 श्रीरामपूर कार्यालय गुरनं 145/2021 मु.प्रो.अ‍ॅक्ट कलम 65 ( ई ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com