
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शेताच्या बांधावरील गवत (Grass Fire) पेटवल्यानंतर लागलेल्या आगीमध्ये (Fire) एका पोलीस कर्मचार्याची खाजगी गाडी जळून खाक (Police Private Car Fire) झाल्याची घटना शनिवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास तालुक्यातील घारगाव (Ghargav) परिसरात घडली.
याबाबत घारगाव पोलिसांकडून (Ghargav Police) समजलेली माहिती अशी की, घारगाव परिसरात राहणार्या जगदीश नानाभाऊ आहेर याने काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याच्या मालकीच्या शेताच्या बांधावर उगलेले व वाळलेले गवत पेटविले. कोणतीही खबरदारी न घेता तो तेथून निघून गेला. दुपारच्या वेळी आग लावल्याने आगीने (Fire) रौद्र स्वरूप धारण केले.
या ठिकाणी कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांची मारुती सुझकी कंपनीची वॅगनर गाडी नंबर एम एच 14 बी आर 727 ही गाडी उभी होती. आगीच्या ज्वालामुळे प्लास्टीक शेडनेटने पेट घेतला. यामुळे चव्हाण यांच्या गाडीला आग लागली. या आगीत गाडी पूर्णपणे जळाली. पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी जगदिश नानाभाऊ आहेर रा. घारगाव, ता. संगमनेर याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 66/2023 भारतीय दंड संहिता कलम 285 प्रमाणे दाखल केला आहे. गाडीला आग (Car Fire) लागली की गाडीला जाणीवपूर्वक आग लावली याबाबत पोलीस नाईक आर. ए. लांघे पुढील तपास करत आहे.