चास शिवारात बालविवाह रोखला

चाईल्डलाईनकडील तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
चास शिवारात बालविवाह रोखला

अहमदनगर (प्रतिनिधी) -

लग्नाची संपूर्ण तयारी झालेली. वधू-वर पक्षाकडील पाहुणेही सभागृहात येऊन बसले. वधू-वरही लग्नमंडपी पोहोचले. थोड्याच वेळात लग्न

लागेल, अशी घोषणाही माईकवरून करण्यात आली. तोच नगर तालुका पोलिसांचे पथक लग्नस्थळी पोहोचली. मुलगी अल्पवयीन असल्याची घोषणा करीत लग्न थांबविण्यात आले.

चास शिवारातील हेमराज मंगल कार्यालयात गुरूवारी ही घटना घडली. दुपारी 12 वाजता लग्न होणार होते. चाईल्ड लाईनला बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. या विवाहाची नगर तालुका पोलिसांना त्वरित लेखी तक्रार देण्यात आली असल्याने लग्न लागणार, तेवढ्यात पोलिसांसह इतर अधिकारी टीम लग्नस्थळी पोहोचली आणि बालविवाह रोखला.

नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाल पोलिस पथकाने तत्पर ही कारवाई करून प्रतिष्ठित नागरिकांच्या कुटुंबातील हा बालविवाह थांबविला. तालुका पोलिसांनी वधू अल्पवयीन असल्याने संपूर्ण कागदपत्रासह बालिकेस व वधू-वराचे आई-वडीलांना पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समितीसमोर हजर केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com