पोलीस असल्याचे भासवून विनामास्क फिणार्‍यांना 4 हजारांना गंडविले

पोलीस असल्याचे भासवून विनामास्क फिणार्‍यांना 4 हजारांना गंडविले

पिंपरी निर्मळ |वार्ताहर)| Pimpari Nirmal

बाभळेश्वरकडून (Babhaleshwar) पिंपरी निर्मळला (Pimpari Nirmal) येताना 400 केव्ही सबस्टेशनजवळ एका दुचाकीस्वाराने पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) येथील विना मास्क (Without Mask) असलेल्या व्यक्तीला अडविले व पोलीस (Police) असल्याचे सांगुन तुम्ही मास्क (Mask) घातलेला नाही मागून साहेब येत आहेत. खिशातले सामान बाहेर काढा म्हणत 4 हजार घेवून पोबारा केला. जाताना या व्यक्तीला नवा कोरा मास्कही (Mask) दिला. मात्र हा मास्क त्यांना चार हजारांना पडला आहे. या रंजक रस्ते लुटीची चर्चा जोरात सुरू आहे.

ठकसेनांकडून लोकांना फसविण्याच्या नवनवीन क्लुप्त्याचा वापर होत आहे. अशीच घटना पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) येथील एका जेष्ठ नागरिकाबरोबर घडली. बाभळेश्वरकडून (Babhaleshwar) आपल्या दुचाकीवर विना मास्क (Mask) घरी येत असताना पिंपरी निर्मळ शिवारातील 400 केव्ही सब स्टेशन जवळ एका अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना थांबविले. आपण मास्क घातलेला नाही. बाभळेश्वर (Babhaleshwar) चौकात साहेबांनी आपल्याला विनामास्क पाहिले असून मी पोलीस आहे व साहेब मागुन येत आहेत. तुमच्यावर कडक कारवाई करतील.खिशात काय काय आहे ते बाहेर काढा असा दम भरला.

या व्यक्तीनेही खिशातीला पैसे व सामान बाहेर काढले. खिशातुन काढलेले चार हजार त्या ठकसेनाने स्वतःच्या खिशात घातले व आपल्याकडील नवा कोरा मास्क पिंपरी निर्मळ येथील व्यक्तीला दिला व मास्क लावा व साहेब येण्याच्या आत पटकन निघा असा सल्ला देवुन स्वतःही निघून गेला. मात्र झालेला प्रकार घरच्यांना सांगितल्यावर तुम्हाला कोणीतरी फसविले आहे. विनामास्क हिंडणे त्या सदगृहस्थांना चार हजारांना पडले आहे. फिल्मी स्टाईलने घडलेल्या या रस्ता लुटीची रंजक चर्चा पिंपरी निर्मळ परीसरात जोरात होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com