
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्यातील पोलीस पाटील हा शासन प्रणालीतील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे पोलीस पाटलांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून यासाठी संबंधित विभाग आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस पाटील यांच्या शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ आणि इतर विविध संघटनांचे शिष्टमंडळ यांच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भाचे निवेदन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे देखील उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी पोलीस पाटील यांच्या शिष्टमंडळाशी सविस्तरपणे चर्चा करून मागण्या जाणून घेतल्या.
राज्यातील पोलीस पाटलांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून यासाठी संबंधित विभाग आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पोलीस पाटील यांच्या शिष्टमंडळाला सांगितले.