पोलीस अधिकार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस अधिकार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कौटुंबिक कारणातून एका सहायक पोलीस निरीक्षकाने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवार सायंकाळी पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तलावाजवळ ही घटना घडली. त्यांच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात नियुक्ती असलेले व सध्या येथील मुख्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात राहतात. शनिवारी त्यांच्या कुटुंबात वाद झाले. या कारणातून त्यांंनी पिंपळगाव माळवी येथील तलावाजवळ जात विषारी औषधाचे सेवन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी नव्हते. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. स्थानिक नागरिकांनीच सहायक निरीक्षक यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री रूग्णालयात त्यांच्या सहकार्‍यांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी रूग्णालयास भेट दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com