पोलीस पतीचे अनैतिक संबंध, श्रीगोंदा येथे पत्नीची आत्महत्या
सार्वमत

पोलीस पतीचे अनैतिक संबंध, श्रीगोंदा येथे पत्नीची आत्महत्या

पोलिस अधिकारी पतीसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

श्रीगोंदा (प्रतिनिधी) - मुंबई येथे नियुक्तीस असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) असणार्‍या पाडूरंग ज्ञानदेव देवकाते यांच्या पत्नी अमिता (वय 27) यांनी मंगळवारी दुपारी शिटे सांगवी (ता. श्रीगोंदे) येथील राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस अधिकारी पतीसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पतीच्या अनैतिक संबधाला वैतागलेल्या अमिता हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे . मयत आमिताचे वडील कैलास दत्तात्रय कोकरे वय 51 वर्षे धंदा शेती , रा . पारोडी , ता . शिरुर यांनी याबाबत फिर्याद दिली असून मयत आमिताचा पती - पाडुरंग ज्ञानदेव देवकाते , सासरा - ज्ञानदेव देवकाते , सासु- संध्या ज्ञानदेव देवकात, दिर- गणेश ज्ञानदेव देवकाते सर्व रा . थिटे सांगवी ता . श्रीगोंदा यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवकाते याचे दुसर्‍या महिलेबरोबर अनैतिक संबध असल्याने तसेच चार चाकी गाडी घेण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत यासाठी मयत अनिताचा शारीरीक व मानसिक छळ सुरु होता. सासू ,सासरे हे मुलास सांगून मयत पत्नीकडे हुडयांची मागणी करायला लावायचे व मयत हीचा छळ करायला सांगायचे त्यामुळे छळाला कंटाळून अमिताने गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हंटले आहे .

Deshdoot
www.deshdoot.com