जिल्हा पोलीस दलात करोनाचा शिरकाव
सार्वमत

जिल्हा पोलीस दलात करोनाचा शिरकाव

मुख्यालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह

Nilesh Jadhav

अहमदनगर |प्रतिनिधी | Ahmednagar

पोलीस मुख्यालयातील एका पोलीस कर्मचार्‍याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्हा पोलीस दलातही करोनाने शिरकाव केला आहे. राज्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये काहींचा मृत्यू झाल्या आहे. परंतू, नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकाही पोलिसांना करोना झाला नव्हता. परंतू, एक पोलीस कर्मचारी बाधित आढळल्याने आता जिल्हा पोलीस दलात करोनाने प्रवेश केला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मागील आठवड्यात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग, लाचलुचपत विभागात करोनाने शिरकाव केला होता. आता जिल्हा पोलीस दलातही करोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुख्यालयातील तो करोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी किती लोकांच्या संर्पकात आला याचा शोध घेतला जात आहे. तो कर्मचारी मुख्यालयात नेमणूकीस असल्याने त्यांचा पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर पोलीस ठाण्याशी संपर्क आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com