पोलीस नाईकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

वर्षभरतील दुसरी घटना
पोलीस नाईकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

अकोले (प्रतिनिधी)-

पाच हजार रूपयांची लाच घेतांना पोलीस नाईक संदीप पांडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस ठाणे आवारातच रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अदखलपात्र गुन्ह्यात दोन आरोपींविरुद्ध चॅप्टर केस लवकर करुन त्यांचा लगेच जामीन करुन देण्यासाठी व त्यातील उर्वरित एका आरोपीच्या विरुद्ध चॅप्टर केस न करता त्याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना अकोले पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यास अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज दूपारी पोलीस ठाणे आवारातच रंगेहाथ पकडले.

पोलीस नाईकाला ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
करोना नियमांचं उल्लंघन, बेशिस्तांकडून १५ लाखांचा दंड वसूल

अकोले पोलीस ठाण्यात सुरू असणारा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रक्षकच बनले भक्षक तर न्याय कुणाकडे मागायचा असा संतप्त सवाल यानिमित्ताने सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. संदिप भाऊसाहेब पांडे (वय वर्ष,33) पोलीस नाईक असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

दरम्यान, अकोले पोलीस ठाण्यात अँटिकरप्शनमध्ये अडकल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. तर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वीच तालुक्याचा गटविकास अधिकारी एका कंत्राटदाराकडूम लाच घेताना रंगेहात पकडला गेला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com