पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

बोल्हेगावातील घटना; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
पोलीस कर्मचार्‍याला मारहाण

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोना निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी नाकाबंदीवर असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव येथे घडली. या प्रकरणी दोघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दादाभाऊ फ्रान्सीस वंजारे (वय 31 रा. गजानन कॉलनी), कैलास साळवे (पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. वंजारे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नाईक अनिल पांडुरंग आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे.

करोना नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी बोल्हेगाव येथे नाकाबंदी करण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी नाकाबंदीचे काम करत असताना त्याठिकाणी आरोपी हे त्यांच्या दुचाकीवरून आले. ते डबल सीट असल्याने पोलीस नाईक आव्हाड यांनी त्यांना दंड भरण्यास सांगीतला. यावेळी कैलास साळवे याने पोलिसांनी शिवीगाळ केले व पळुन गेला. त्यानंतर आरोपी दादाभाऊ वंजारे याला आव्हाड यांनी दंड भरण्यास सांगितला. वंजारे याला राग येऊन त्याने आव्हाड यांची गणवेशाची गचांडी पकडुन त्याच्या गालावर चापटीने मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक पाठक करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com