शेवगाव मध्ये पोलिसांचे मॉब कंट्रोल मॉक ड्रिल
सार्वमत

शेवगाव मध्ये पोलिसांचे मॉब कंट्रोल मॉक ड्रिल

गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर अधिकारी व पोलिस कर्मचऱ्याचे मॉब कंट्रोल मॉक ड्रिल घेण्यात आले.

sukhdev fulari

sukhdev fulari

शेवगाव|तालुका प्रतिनिधी|Shevgaon

गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर शेवगाव येथे शेवगाव उपविभागा अंतर्गत येणाऱ्या 5 पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलिस कर्मचऱ्याचे मॉब कंट्रोल मॉक ड्रिल घेण्यात आले.

शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांचे नियंत्रणाखाली शेवगाव येथे आखेगाव रोड वरील मोकळ्या मैदानात हे मॉक ड्रिल घेण्यात आले. शेवगाव, नेवासा, पाथर्डी, सोनई व शनी शिंगणापूर या पाच पोलीस ठाण्यातील पोलिस अधीकारी व कर्मचारी यात सहभागी झाले होते.

या बाबद माहिती देतांना उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे म्हणाले, उपविभागा अंतर्गत येणाऱ्या 5 पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हे मॉब कंट्रोल मॉक ड्रिल घेण्यात आले. शासनाचे कोविड 19 चे सर्व नियम पळून आपल्याला हा गणेशोत्सव साध्यापणाने साजरा करायचा आहे.कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असे सर्व नागरिकांना आवाहन आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी व परिस्थिती नियंत्रणासाठी पोलीस दल सजग आणि सक्षम आहे हे दाखविण्यासाठी हे मॉक ड्रिल आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com