राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची बदली

राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांची बदली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राहुरी पोलीस ठाण्याचे (Rahuri Police Station) पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (Police Inspector Nandkumar Dudhal) यांची नाशिक ग्रामीण येथे बदली (Transferred to Nashik Rural) करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी याबाबत आदेश काढले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपुत (Assistant Inspector of Police Shankarsingh Rajput) यांच्याकडे तात्पुरते स्वरूपात राहुरी पोलीस ठाण्याचा (Rahuri Police Station) पदभार देण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी निरीक्षक दुधाळ (Police Inspector Nandkumar Dudhal) यांची मुंबई शहर (Mumbai City) ते अहमदनगर (Ahmednagar) अशी बदली दर्शविण्यात आली होती. यामुळे ते अहमदनगर पोलीस दलात हजर झाले होते. अधीक्षक पाटील (SP Manoj Patil) यांनी त्यांच्याकडे राहुरी पोलीस ठाण्याची (Rahuri Police Station) जबाबदारी दिली होती. परंतु, मुंबई शहर ते अहमदनगर येथे करण्यात आलेल्या बदली आदेशामध्ये अंशत: बदल करून त्यांचे विनंतीनुसार नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली असल्याने त्यांना अहमदनगर जिल्ह्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात राहुरी तालुक्यातील (Rahuri) देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथील आढावा बैठकीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे (Shrirampur Assembly constituency) आमदार लहू कानडे (MLA Lahu Kanade) व पोलिस निरीक्षक यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली होती. या बदलीशी ‘ त्या’ वादाशी कुठलाही संबध नसला तरी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ (Police Inspector Nandkumar Dudhal) यांच्या बदलीमुळे त्या वादाच्या घटनेला उजाळा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com