पोलिसांकडून अवैध शस्त्रे शोध मोहीम

नाशिकचे उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांचे आदेश
पोलिसांकडून अवैध शस्त्रे शोध मोहीम
police

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रे बाळगणार्‍याविरोधात कारवाई (Order to take action against illegal possession of weapons in the district) करण्याचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर (Nashik Deputy Inspector General of Police Dr. B. G. Shekhar) यांनी दिले आहेत. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांच्या स्वतंत्र पथकाची नेमणूक करून शोध मोहीम सुरू केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे (Gavthi Katta), तलवारी (Sword) व धारदार शस्त्रांचा वापर वाढला आहे. रस्तालूट, दरोड्याच्या (Robbery) घटनांबरोबर हाणामारीच्या घटनांमध्ये अवैध शस्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मध्यंतरी अहमदनगर शहरासह (Ahmednagar City) राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) कोल्हारमध्ये (Kolhar) दोन गटांत झालेल्या हाणामारीत तलवारीचा वापर केला गेला. यापूर्वी जिल्ह्यात गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

अलिकडच्या काळात रस्तालुटीमध्ये सराईत गुन्हेगारांकडून गावठी कट्टे व धारदार शस्त्रांचा वापर करून वाहन चालकांना मारहाण करत लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नाशिक परिक्षेत्राचे नवनियुक्त पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. शेखर (Nashik Deputy Inspector General of Police Dr. B. G. Shekhar) यांनी अवैध शस्त्रे वापरण्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना दिले आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अपर अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल (Additional Superintendent Saurabh Kumar Agrawal) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katke) यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके नियुक्त केली आहेत.

Related Stories

No stories found.