पोलीस अंमलदारासह होमगार्डला मारहाण

सिव्हील हडको परिसरातील घटना; दोघांविरूध्द गुन्हा
पोलीस अंमलदारासह होमगार्डला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील सिव्हील हडको परिसरात दोघांनी तोफखाना पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या अंमलदारासह होमगार्डला शिवीगाळ व दमदाटी करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल शंकर भालेराव (वय 36) यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश बाळासाहेब गायकवाड (रा. गणेश चौक, सिव्हील हडको) आणि एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान तोफखाना पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांनी सिव्हील हडको परिसरात काही जण मोठमोठ्याने आरडाओरड करत असल्याची माहिती अंमलदार भालेराव यांना दिली.

भालेराव सोबत एक होमगार्ड घेऊन घटनास्थळी गेले. त्याठिकाणी कारवाई करत असताना आकाश गायकवाड आणि त्याच्या साथीदाराने भालेराव आणि त्यांच्या सहकार्‍याला शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com