अहमदनगर (प्रतिनिधी)- रेखा जरे हत्याकांड प्रकरणात अटक टाळण्यासाठी दडी मारून बसलेल्या बाळ बोठेच्या अटकेसाठी पोलिसांनी आता कायद्याचा आधार घेतला आहे. अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी त्याला हजर राहण्याचे आदेश करावेत असे पत्र पोलिसांनी आज कोर्टाला दिले. दरम्यान पोलिसांनी म्हणणे देण्यास वेळ मागितल्याने बोठेच्या अटकपूर्व जामिनावर आज होणारी सुनावणी आता 14 डिसेंबरला होणार आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्या प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार बाळ.ज.बोठे हा सूत्रधार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. पोलिसांनी त्याला आरोपी करताच तो नगरमधून पसार झाला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले, पण तो मिळून आला नाही. दरम्यान त्याने अॅड. महेश तवले यांच्यामार्फत कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या जामिन अर्जावर कोर्टाने पोलिसांचे म्हणणे मागवित आज शुक्रवारी (दि.11) त्यावर सुनावणी ठेवली होती.

तपासी अधिकारी डीवायएसपी अजित पाटील यांनी जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील यांच्यामार्फत कोर्टाकडे अर्ज सादर केला. अटकपूर्व जामिन अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी सरकारी वकिल पाटील यांनी कोर्टाकडून मुदत मागवून घेतली. त्यानंतर तपासी अधिकारी पाटील यांचा अर्ज कोर्टात दाखल केला. त्या अर्जात अटकपूर्व जामिन अर्जाच्या सुनावणीवेळी बाळ बोठेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. कोर्ट त्यावर काय निर्णय देणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत दडून बसला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस वणवण फिरत असून तो हाती लागत नाही. त्यामुळे आता पोलिसांनी कायद्याचा आधार घेतला आहे.

बोठेची कोंडी

अटकपूर्व जामिनासंदर्भातील प्रक्रिया कायद्यातील 438 (1)(ब) मध्ये नमूद करण्यात आली आहे. त्याचाच आधार घेत तपासी अधिकारी डीवायएसपी पाटील यांनी सुनावणीवेळी आरोपीला हजर ठेवण्यासाठी कोर्टाला पत्र दिले आहे. आता त्यावर कोर्ट आदेश करणार आहे. आरोपीत नाव आले असले आणि पोलिसासमोर हजर रहायचे नसेल तर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना या कलमाचा आधार घेतला जातो. त्याच कलमातील बारकावे पोलिसांनी शोधून बोठेची कोंडी करण्यासाठी कायद्याचा आधार घेतल्याची चर्चा आहे.

शिंदे, शेख पुन्हा पोलीस कोठडीत

दरम्यान पोलिसांनी जरे हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत ज्ञानेश्वर शिंदे, फिरोज शेख, आदित्य सुधाकर चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषीकेश ऊर्फ टम्या वसंत पवार या पाच जणांना अटक केली आहे. पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडीत असलेल्या शेख व शिंदेंची पोलीस कोठडीत कालच मिळविली आहे. चोळके, भिंगारदिवे, पवार यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना पारनेरच्या कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्या प्रकरणात ज्येष्ठ पत्रकार बाळ.ज.बोठे हा सूत्रधार असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. पोलिसांनी त्याला आरोपी करताच तो नगरमधून पसार झाला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले, पण तो मिळून आला नाही. दरम्यान त्याने अॅड. महेश तवले यांच्यामार्फत कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या जामिन अर्जावर कोर्टाने पोलिसांचे म्हणणे मागवित आज शुक्रवारी (दि.11) त्यावर सुनावणी ठेवली होती.

तपासी अधिकारी डीवायएसपी अजित पाटील यांनी जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील यांच्यामार्फत कोर्टाकडे अर्ज सादर केला. अटकपूर्व जामिन अर्जावर म्हणणे दाखल करण्यासाठी सरकारी वकिल पाटील यांनी कोर्टाकडून मुदत मागवून घेतली. त्यानंतर तपासी अधिकारी पाटील यांचा अर्ज कोर्टात दाखल केला. त्या अर्जात अटकपूर्व जामिन अर्जाच्या सुनावणीवेळी बाळ बोठेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. कोर्ट त्यावर काय निर्णय देणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.

बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देत दडून बसला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलीस वणवण फिरत असून तो हाती लागत नाही. त्यामुळे आता पोलिसांनी कायद्याचा आधार घेतला आहे.

बोठेची कोंडी

अटकपूर्व जामिनासंदर्भातील प्रक्रिया कायद्यातील 438 (1)(ब) मध्ये नमूद करण्यात आली आहे. त्याचाच आधार घेत तपासी अधिकारी डीवायएसपी पाटील यांनी सुनावणीवेळी आरोपीला हजर ठेवण्यासाठी कोर्टाला पत्र दिले आहे. आता त्यावर कोर्ट आदेश करणार आहे. आरोपीत नाव आले असेल आणि पोलिसासमोर हजर रहायचे नसेल तर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करताना या कलमाचा आधार घेतला जातो. त्याच कलमातील बारकावे पोलिसांनी शोधून बोठेची कोंडी करण्यासाठी कायद्याचा आधार घेतल्याची चर्चा आहे.