पोलीस दल, आर्मीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण आवश्यक

खा. डॉ. सुजय विखे : राहाता महाविद्यालयात भरतीपूर्व प्रशिक्षणाची सोय
पोलीस दल, आर्मीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण आवश्यक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

पोलीस दल अथवा आर्मीमध्ये जाण्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुणांना भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी राहाता महाविद्यालयाने चांगली सोय केली आहे, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

येथील शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एनसीसी कॅडेट, आर्मी, पोलीस भरती मैदानी सरावासाठी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ऑबस्टॅकल ट्रेनिंग (अडथळा प्रशिक्षण) साधने बसविण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजुरकर, संस्थेचे डायरेक्टर डॉ. महेश खर्डे, भारत लोखंडे, दत्तात्रय घोगळ, पिंपळसच्या सरपंच नंदाताई घोगळ, बाजार समितीचे संचालक वाल्मिकराव गोर्डे, नंदकुमार गव्हाणे आदी यावेळी उपस्थित होते.

राहाता महाविद्यालयाने आपल्या मैदानावर ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. देशाच्या सेवेसाठी, राज्याच्या सेवेसाठी आर्मी तसेच पोलीस दलात सहभागी होण्यासाठी या संधीचा फायदा घ्यावा, असेही खा. डॉ. विखे पाटील म्हणाले.

प्राचार्य संजय लहारे यांनी प्रास्तविक केले. संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. महेश खर्डे यांचे मार्गदर्शनाखाली वर्षभर सातत्याने विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तसेच राहाता व गणेश परिसरातील युवकांसाठी महाविद्यालयात पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. पोलीस, आर्मी भरतीसाठी अडथळा प्रशिक्षण असते. त्याचा विद्यार्थ्यांना सराव व्हावा व परिसरातील जास्तीत जास्त युवक युवतींची निवड पोलीस व आर्मी भरतीत भावी उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 270 बाय 20 लांबीच्या मैदानात 10 वेगवेगळ्या प्रकारचे अडथळा प्रशिक्षण साधने बनविण्यात आली आहेत.

प्राचार्य संजय लहारे, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य सुनील दंडवते, सामाजिक कार्यकर्ते राहुल सदाफळ, अजय आग्रे, कला विभाग उपप्राचार्य डॉ. दादासाहेब डांगे, विज्ञान विभाग उपप्राचार्य टी. के. कुमकर, वाणिज्य विभाग उपप्राचार्य डॉ. सुरेश पुलाटे, डॉ. विष्णू पावडे, प्रा. चंद्रकांत बनसोडे, प्रदीप गमे, प्रा. समीर सय्यद, राम वाणी, अण्णसाहेब यादव, विलास ब्राह्मणे सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.