पोलीस हवालदाराने मागितली ५० हजाराची लाच, गुन्हा दाखल

जिल्ह्यातील 'कोणत्या' पोलीस ठाण्यात घडली घटना?
पोलीस हवालदाराने मागितली ५० हजाराची लाच, गुन्हा दाखल

अहमदनगर|Ahmedagar

गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 50 हजाराची मागणी करून तडजोडीअंती 22 हजार रूपये लाच मागितल्याप्रकरणी (Bribe Demand) बेलवंडी पोलीस ठाण्याचा (Belwandi Police Station) पोलीस हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश आसाराम बारवकर (वय 56 रा. बेलवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव आहे. नगरच्या लाचलुचपत विभागाने (Bribery Division) ही कारवाई केली असून बारवकर याला ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील (Shrigonda Taluka) येळपणे (Yelpane) येथील तक्रारदार यांना बारवकर याने त्याच्याकडे तपासकामी असलेल्या मिसींगमध्ये मदत करून मिसींग प्रकरण बंद करणेसाठी 50 हजाराची मागणी केली. तक्रारदार यांनी नगरच्या लाचलुचपत विभागाकडे (Bribery Division) तक्रार दाखल केली. 17 सप्टेंबरला लाच मागणी पडताळणीमध्ये बारवकर याने बेलवंडी पोलीस ठाण्यात पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 50 हजाराची मागणी करून तडजोडीअंती 22 हजार रूपये लाच मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली.

म्हणून नगर लाचलुचपत विभागाने (Nagar Bribery Department) मंगळवारी हवालदार बारवकर याच्याविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे, पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हरून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.