पोलीस कर्मचार्‍याने जप्त मुद्देमालाचा केला अपहार

'या' पोलीस ठाण्यातील प्रकार, गुन्हा दाखल
पोलीस कर्मचार्‍याने जप्त मुद्देमालाचा केला अपहार

अहमदनगर|Ahmedagar

एका पोलीस कर्मचार्‍याने (Police) गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फायनान्स बँकेत तारण ठेऊन त्यावर कर्ज (Loan) काढले. तसेच पाच लाख 46 हजार 640 रूपये स्वत:च्या फायद्यासाठी खर्च केले (Self Expenses) असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) नेमणूकीस असलेला पोलीस नाईक गणेश नामदेव शिंदे असे या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Police Camp) गुन्हा दाखल केला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी फिर्याद दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com