
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पोलिसात (Police) तक्रार देणार्या महिलेचा विनयभंग (Woman Molested) करून धमकावण्यात आले. सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील एका उपनगरात शुक्रवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी सुरज नंदकुमार औटी (रा. सहकारनगर, पाईपलाईन रस्ता) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज औटी यांचे मालमत्ताच्या कारणातून सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील एका कुटुंबाशी वाद आहेत. सुरज आणि त्याची आई शोभा यांना या कुटुंबातील एका वृध्द महिलेला सायंकाळी सव्वा पाच वाजता धमकावले (Threat) होते. या वृध्द महिलेने सुनेसह तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल (Filed a Case) केला होता. तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती सुरज याला मिळाली.
त्यावर तो पुन्हा या कुटुंबाच्या घरी रात्री आठ वाजता आला. त्याने महिलेला धमकावले. ‘पोलीस ठाण्यात तक्रार का दिली’, असे म्हणून धमकावले तसेच जीव मारण्याची धमकी (Threat) दिली. या महिलेशी गैरवर्तन केले. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज औटी याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अधिक माहिती घेऊन तपासाबाबत पोलीस अंमलदारांना सूचना दिल्या आहेत.