पोलीस आयुक्त विश्वास नांगरेंनी केले कार्तिक घोगरेचे अभिनंदन
सार्वमत

पोलीस आयुक्त विश्वास नांगरेंनी केले कार्तिक घोगरेचे अभिनंदन

Arvind Arkhade

कोपरगाव|प्रतिनिधी| Kopargav

सध्या करोना महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असताना कर्तव्यदक्ष पोलिस सर्व प्रकारच्या कामाचा ताण सहन करत धैर्याने आपले कर्तव्य बजावत आहे त्याबद्दल कोपरगाव शहरातील अन्नपूर्णानगर येथील कार्तिक प्रसाद घोगरे या मुलाने आपले लाडके पोलीस दादा या काव्यातून शब्दबद्ध केले.

त्याबद्दल त्याचे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका पत्राद्वारे विशेष अभिनंदन करून, भविष्यात त्याला आयपीएस अधिकारी होण्याच्या स्वप्नांना बळ दिले आहे. कार्तिक प्रसाद घोगरे सध्या औरंगाबाद येथे शिक्षण घेत आहे. करोना महामारीत त्याने पोलिसांचे काम अतिशय जवळून पाहिले आहे.

त्यांच्या विषयीच्या भावना त्याने आपले लाडके पोलिसदादा अशी कविता रचून व्यक्त केल्या. त्यांने ही कविता पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पाठवली होती. पत्रात त्याने आपल्यालाही आयपीएस अधिकारी होऊन देशसेवा करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यावर त्यांनी खास पत्राद्वारे हार्दिक अभिनंदन केले आहे. कार्तिक हा माजी मुख्याध्यापक पोपटराव घोगरे यांचा नातू तर प्रसाद यांचा चिरंजीव आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com