पोलिसांकडून 605 किलो अंमली पदार्थांचा नाश

पोलिसांकडून 605 किलो अंमली पदार्थांचा नाश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील 28 वर्षांपासून प्रलंबित असलेला एकूण 605 किलो 752 ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा, अफू, गर्द) जिल्हा पोलीस दलाने बुधवारी राजंणगाव एमआयडीसी (जि. पुणे) येथे नाश केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

अंमली पदार्थ विरोधी कायदा सन 1985 अन्वये अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात सन 1994 ते 2005 पर्यंतच्या एकूण 26 गुन्ह्यात 605 किलो 752 ग्रॅम गांजा, अफू, गर्द जप्त करण्यात आले होते. न्यायालयात नियमित सुनावणी होऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने मुद्देमाल नाश करण्याबाबत आदेश दिले होते.

पोलीस अधीक्षक पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (गृह) मेघश्याम डांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विष्णू घोडेचोर, भाऊसाहेब कुरूंद, सखाराम मोटे, शरद बुधवंत, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, संतोष लोंढे, जयराम जंगले, अर्जुन बडे, संभाजी कोतकर, चंद्राकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कार्यवाही पूर्ण केली आहे.

Related Stories

No stories found.