मंदिरात झोपने पडले महागात पोलिसांनी केला दंड वसूल

मंदिरात झोपने पडले महागात पोलिसांनी केला दंड वसूल

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील हनुमान मंदिरात झोपने तिघांना चांगलीच महागात पडले. पोलीसांनी त्यांच्याकडून दंड वसूल करत त्यांना समज देण्यात दिली.

कडक निर्बंध असताना नागरिक विनाकारण घराच्या बाहेर पडतात माक्स सँनीटायगरचा वापर करीत नाही. हा आजार अत्यंत गंभीर असताना आपण आपली काळजी का घेत नाही. गावाच्या बाहेर अतिशय महत्त्वाचे काम असल्याशिवाय पडू नये किंवा आपल्या गावात कोणालाही येऊ देऊ नये. असे आवाहन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पोलीस व्हँनच्या साह्याने प्रत्येक गल्लीबोळात माईक हातात घेत सांगितले. यावेळी पो.कॉ. साळुंके, शेख, उपसरपंच किशोर जावळे, पोलीस पाटील दगू गुडघे, संजय गुडघे, भाऊसाहेब खरे अदी होते. नगदवाडी सोनेवाडी परिसरात त्यांनी विनाकारण फिरणार्‍या नागरिकांकडून दंड वसूल केला.

किराणा दुकान व अत्यावश्यक सेवावाल्यांना फक्त सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आपले व्यवहार करण्यासाठी मार्गदर्शन केले. हनुमान मंदिरात झोपणार्‍या व्यक्तीवर कारवाई करत गावातील सर्व मंदिरे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुलुप आणत लाँकडाऊन असेपर्यंत बंद करण्यात आली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com