पोलिसांच्या कारवाईमुळे भाजीपाला, फळे विक्रेत्यांची धावपळ

अनेकांवर दंडात्मक कारवाई
पोलिसांच्या कारवाईमुळे भाजीपाला, फळे विक्रेत्यांची धावपळ

राहाता |प्रतिनिधी| Rahata

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता पोलिस यंत्रणा आणखीच सतर्क झाली असुन काल सोमवारी राहाता शहरात चितळीरोड वरील भाजीपाला आणि फळे विक्रेत्यांची् धरपकड करून त्यांचे वजनकाटे जप्त करण्यात आले. दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. दंडाची रक्कम जास्त असल्याने मात्र पोलिसांच्या दंडात्मक कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी दिसून आली.

राहाता तालुक्यात दररोज दोनशेहून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. भाजीपाला, फळे आणि दूध खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याने एकीकडे नगरपालिका कारवाई करत आहे तर आता पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने व्यवसायिक धास्तावले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने रोजगार नसल्याने अनेक जण भाजीपाला विक्री करत आहेत. कारवाई मुळे भाजी विक्रेत्यांमध्ये भिती निर्माण झाली आहे. यात अनेक शेतकरी देखील शेतमालाची हात विक्री करता. कारवाईच्या भितीने रोजच धावपळ आणि आता दंडात्मक कारवाईमुळे आता जगायच कस असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.वेळेत भाजीपाला व फळे हा माल विकला गेला नाही तर तो खराब होत असल्याने आर्थक नुकसान देखील होत आहे. न.पा किंवा पोलिस प्रशासनाने प्रशस्त जागा तसेच वेळ ठरवून द्यावा अशी मागणी विक्रेते करत आहेत.

दरम्यान नगरपालिकेने आज पुन्हा एकदा फळभाजी विक्रेत्यांच्या करोना तपासण्या केल्या. दिवसभरात 88 रँपीड टेस्ट तर 20 आरटीपीसीआर चाचण्या केल्या यात 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगरपालिकेच्या तपासणी मोहीमेमुळे विनाकारण बाहेर फिरणार्‍यांची संख्या काहीशी रोडावली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com