पोहेगाव डोर्‍हाळे रोडवर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी

पोहेगाव डोर्‍हाळे रोडवर खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ते डोर्‍हाळे रोड अत्यंत खराब झाला असून या रोडवर खड्डे पडले आहे. खड्ड्यामुळे दररोज अपघात घडतात. या रस्त्याचे तातडीने दुरूस्ती होणे गरजेचे असल्याचे कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानदेव औताडे यांनी सांगितले.

सोमवारी गोदावरी कालव्याच्या पुलाच्या बाजूला स्टील घेऊन जाणारा ट्रक या खड्ड्यांमुळे पलटी झाला. सुदैवाने आजूबाजूला कोणी नसल्यामुळे जीवित हानी झाली नाही. मात्र असे प्रसंग वारंवार घडत असल्यामुळे वाहन चालक या रोडने जाण्यास कंटाळले आहे. आसपासच्या गावातील नागरिक पोहेगाव मध्ये कामानिमित्त येतात.

तर पोहेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे परिसरातील अनेक रुग्णांना याच रस्त्याने जावे लागते. आता कोल्हे व काळे कारखान्याच्या ऊस तोडी चालू आहे. मात्र या रोडला अनेक खड्डे असल्यामुळे ऊस तोडणी कामगारांना मोठी कसरत करावी लागते. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याचे काम तातडीने होणे गरजेचे आहे असे मत औताडे यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com