पोहेगाव परिसरात अवैध धंद्यांसह चोर्‍या मोठ्या प्रमाणात वाढल्या

नागरिक त्रस्त
पोहेगाव परिसरात अवैध धंद्यांसह चोर्‍या मोठ्या प्रमाणात वाढल्या

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

पोहेगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने खुलेआम बेकायदा दारूविक्री, मटका जुगार पाकीटमारी भुरट्या चोर्‍या सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील महिलांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

पोहेगाव पोलीस दूरक्षेत्र बंद असल्याने अवैध धंद्यासह चोर्‍यामार्‍याचे प्रमाण वाढले आहे. पोहेगावमध्ये दूरक्षेत्र सुरू झाले तेव्हा सुरुवातीला काही वर्ष शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत दूरक्षेत्राचे दैनंदिन काम चालू झाले असता घरफोड्या व अवैध धंद्यांना आळा बसला. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून अपुरे कर्मचारी संख्येचे कारणे देऊन आऊट पोस्ट बंद ठेवण्यात आले. दूरक्षेत्राच्या अंतर्गत परिसरातील 10 ते 12 गावांचा समावेश असून शिर्डी पोलीस स्टेशन कुठल्याही कर्मचार्‍यांची नेमणूक करत नाही.

त्यामुळे पोहेगाव व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने खुलेआम बेकायदा दारूविक्री, मटका जुगार पाकीटमारी भुरट्या चोर्‍या सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील महिलांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. शनिवारी गावातील ए टी एम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडून पाच लाख रुपये चोरून नेले. हाकेच्या अंतरावर असलेले आऊट पोस्ट चालू असते तर या घटना घडल्या नसत्या.अनेक वेळा हे आऊट पोस्ट चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीने गाव बंद करत रास्ता रोको आंदोलनही केले.

सरपंच अमोल औताडे यांनी ग्रामसभा घेत सर्व निवेदने पोलीस अधिक्षकांना पाठवली या सर्व परिस्थितीची दखल पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतली. शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत किमान कर्मचार्‍यांची नेमणूक करून दूरक्षेत्र सुरू करून पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक करून अहवाल सादर करण्याची सूचनाही केली. मात्र शिर्डी पोलीस स्टेशनकडून या पत्राला केराची टोपलीच मिळाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com