पोहेगाव परिसरात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

मकाचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता
पोहेगाव परिसरात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात यावर्षी सोयाबीनचे पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. काही ठिकाणी पेरणी होऊन पंधरा दिवस झाले आहेत तर काही ठिकाणी आता पेरणी झाली आहे. रांजणगाव देशमुख परिसरात यावर्षी जूनमध्ये बरा पाऊस झाला. पोहेगाव परिसरात अनेक शेतकर्‍यांनी नवीन ऊस लागवड करण्याची टाळले आहे.

मागील हंगामातील सोयाबिनला काही काळासाठी चांगला भाव मिळाला. त्यामुळे यावर्षी बर्‍याच शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीला प्राधान्य दिले आहे. मकाचे क्षेत्र मागच्या तुलनेत घटणार आहे. मागे सोयबीनचा भाव आठ हजारापर्यंत ठराविक दिवसापुरता झाला होता. अजून भाव वाढेल म्हणून अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन साठवून ठेवली. परंतु आता पुन्हा भाव 7 हजारांच्या दरम्यान झाले आहे.

मकाचे क्षेत्र मागच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसत आहे. चांगला पाऊस झाला तर रब्बी हंगामात मकाची पेरणी करू अशी भूमिका शेतकर्‍यांची आहे. ऊस तोडणीची मागील वेळी आलेल्या अडचणीमुळे काही शेतकर्‍यांनी आता ऊस लागवड नकोची भूमिका घेतली आहे. ऊस तोडणी मजुरांमुळे अनेक शेतकर्‍यांना उशिरा ऊसतोडणी मिळाली. त्यामुळे यावर्षी जरा मागील तुलनेत नविन ऊस लागवड करण्याकडे कल कमी दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com