पोहेगाव परिसरात करोना महामारीत अवैध व्यवसाय तेजीत

शिर्डी पोलिसांचा मात्र कानाडोळा
पोहेगाव परिसरात करोना महामारीत अवैध व्यवसाय तेजीत

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात करोना महामारीत अवैध धंदेवाल्यांनी कात टाकली असून दाम दुप्पटीवर दारूची विक्री करणारांची चंगळ होत आहे.

या सर्व गोष्टीला करण्याच्या पार्श्वभूमीवर पोहेगाव परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे मात्र शिर्डी पोलीस स्टेशनने याकडे कानाडोळा केला आहे.

करोना चा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी पोहेगाव परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बंदच्या काळातही अवैध दारू व मटका विक्रेत्यांनी पोलिसांचे अभय मिळवत खुलेआम दारू विक्री करण्याची नवीन पद्धत अवलंबली आहे. ज्या व्यक्तीला दारू पाहिजे त्या व्यक्तीकडे हे बहादर मोटर सायकलवरून दारूच्या बाटल्या पोहोच करतात. बंदच्या काळात तळीरामांना दारू मिळाल्याने त्यांची परिसरात वर्दळ वाढली आहे. या अवैध दारूविक्रीमुळे होणार्‍या गर्दीतून अनेकांना कोरोना महामारीची बाधा झाली आहे.

पोहेगांव परिसरात अनेक रुग्ण करोनाने मयत झाले आहेत. पोहेगाव ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने परिसरात कोरोना रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. सुज्ञ नागरिकही यात सहभागी होऊन लाँकडाऊनचे सर्व नियम पाळत आहे. परंतु अवैद्य धंदे करणार्‍यांकडून सर्वच नियम धाब्यावर बसवून खुलेआम दारू विक्री सुरू असल्याने कोरोनाची साखळी तोडण्याचा अडसर निर्माण होत आहे. परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱाना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. परिसरात दारू विक्री होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने दारूबंदी केलेली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनची कारवाईच कुचकामी होत असल्याने अवैद्य धंदेवाल्यांचे फावले जात आहे. पोहेगाव परिसरातील दारू विक्री थांबेल का? शिर्डी पोलीस स्टेशन यावर कायमस्वरूपी कारवाई करेल का? असे अनेक प्रश्न या परिसरात उपस्थित होत आहे.

पोहेगांव परिसरात अनेक रुग्ण करोनाने मयत झाले आहेत. पोहेगाव ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने परिसरात कोरोना रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. सुज्ञ नागरिकही यात सहभागी होऊन लाँकडाऊनचे सर्व नियम पाळत आहे. परंतु अवैद्य धंदे करणार्‍यांकडून सर्वच नियम धाब्यावर बसवून खुलेआम दारू विक्री सुरू असल्याने कोरोनाची साखळी तोडण्याचा अडसर निर्माण होत आहे.

परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱाना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. परिसरात दारू विक्री होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने दारूबंदी केलेली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनची कारवाईच कुचकामी होत असल्याने अवैद्य धंदेवाल्यांचे फावले जात आहे. पोहेगाव परिसरातील दारू विक्री थांबेल का? शिर्डी पोलीस स्टेशन यावर कायमस्वरूपी कारवाई करेल का? असे अनेक प्रश्न या परिसरात उपस्थित होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com