पोहेगाव परिसरात विजेचा लपंडाव, शेतकरी हैराण
File Photo

पोहेगाव परिसरात विजेचा लपंडाव, शेतकरी हैराण

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व रांजणगाव देशमुख परिसरात विजेचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला असून वीज वितरण कंपनी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकर्‍यांनी अनेकवेळा वीज वितरण कार्यालयात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मात्र वीज वितरण कंपनी शेतकर्‍यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत नाही केला तर कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व रांजणगाव परीसरात शेतात उभी असलेली पिके केवळ विजेअभावी जळून जात आहेत. रांजणगाव देशमुख परिसरात थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यावर कांद्याची लागवड सुरू आहे. परंतु दिवसभरात संपूर्ण तासभरही वीज टिकत नाही. वाफ्यात पाणी गेले की वीज गायब होते. सातत्याने लंपडाव सुरू असतो. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे. त्यामुळे विजेची मागणीही तुलनेने मागील वर्षापेक्षा कमी आहे. मागील वर्षी वीज तुलनेने बरी चालली मात्र यावर्षी अजिबातच वीज साथ देत नाही.

शेतकरी अगोदरच मेटाकुटीस आलेला आहे.खतांचे, औषधांचे वाढलेले भाव, शेतीमालाला भाव नाही त्यात विजेचा लंपडाव. शेतकर्‍यांनी नेमके काय करावे. घरगुती वीज ग्राहकांनाही अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. शेती पंपाचा वीज पुरवठा केव्हा सुरळीत होईल याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून आहे. वेळेत वीजपुरवठा सुरळीत नाही झाला तर पिके जळून जाणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com