पोहेगाव वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकर्‍यांचा मोर्चा

पोहेगाव वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकर्‍यांचा मोर्चा

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा केवळ वीस मिनिटे होत असल्याने

येथील शेतकरी संतप्त झाले होते. सोनेवाडी येथे काल सकाळी शेतकर्‍यांनी बैठक घेत थेट वीज वितरण कंपनीच्या पोहेगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढला. वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना आपल्या शैलीत त्यांनी जाब विचारला.

यावेळी हरिभाऊ जावळे, पुंजाभाऊ जावळे, बहिरु मिंड, भास्कर गुडघे, उपसरपंच किशोर जावळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, माजी सरपंच विजय जगताप, भाजपचे उपाध्यक्ष गणेश राऊत, संघटक शांताराम जायपत्रे, शिवाजी जावळे, निरंजन गुडघे, संजय गुडघे, लक्ष्मण गुडघे, मच्छिंद्र जावळे, राजेंद्र गुडघे, संजय गुडघे आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी किशोर जावळे, विजय जगताप, संजय गुडघे, राजेंद्र गुडघे यांनी सोनवडी परिसरातील गोदावरी उजव्या कालव्याला पाणी आल्यानंतर वीज वितरण कंपनीचे अधिकारी परिसरातील वीज विनाकारण खंडित करतात तसेच वीज चालू करताना उलट्या पद्धतीने लाईट देतात त्यामुळे विद्युत मोटारी जळण्याचा धोका संभवतो. पोहेगाव व सावळिविहीर परिसरात गोदावरी उजवा कालवा वाहत असतानाही तेथील वीज का कमी केली जात नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सोनेवाडी परिसरात विज देताच कशाला, सर्व वीज कमी बंद करा, आम्हाला वीज नकोच, असा पवित्रा घेत शेतकर्‍यांनी तेथे धरणे धरली. अधिक आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांचा पवित्रा पाहता तेथील अधिकार्‍यांनी राहाता येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी उपअभियंता पाटील यांना भ्रमणध्वनीवरून फोन लावला. पाटील यांनी तात्काळ शेतकर्‍यांची दखल घेत घटनास्थळ गाठले व दोन दिवसांत वीज सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

पोहेगाव परिसरातील चांदेकसारे, सोनेवाडी घारी, डाऊद खुर्द येथे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पोहेगावच्या स्टेशनचे विभाजन करून अतिरिक्त लाईट मिळण्यासाठी चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या वतीने सबस्टेशला लागणारी जागा उपलब्ध करून दिली आहे. तिचा ठराव व मंजुरीची प्रतही राहाता येथील उपकार्यकारी अभियंता पाटील यांच्याकडे पोहच करण्यात येणार आहे. चांदेकसारे येथे सबस्टेशन झाल्यानंतर परिसरातील शेतकर्‍यांची अडचण दूर होईल.

- केशवराव होन, माजी सरपंच

परिसरात विजेची गरज पाहता पोहेगाव सबस्टेशनवर जास्त लोड आहे. संपूर्ण ठिकाणी कॅपॅसिटर बसवावे लागणार आहे. पोहेगावचे सब स्टेशनचे विभाजन झाल्यावर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. त्यासाठी चांदेकसारे येथे वीज वितरण कंपनीला सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करण्याचे काम युद्धपातळीवर आहे.

- उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com