पोहेगाव आजपासून पाच दिवस बंद
सार्वमत

पोहेगाव आजपासून पाच दिवस बंद

पोहेगाव मधील रुग्ण संख्या 17 वर

Nilesh Jadhav

सोनेवाडी | वार्ताहर | Sonewadi

पोहेगाव येथे परवा सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी चार जणचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे.

गावात करोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पाच दिवस शुक्रवार ते मंगळवार पर्यंत संपूर्ण गावातील व्यवहार बंद राहतील. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन सरपंच अमोल औताडे यांनी केले आहे. पोहेगाव येथील करोना दक्षता टिमही सक्रिय झाली असून विनाकारण फिरणारावर कारवाई तसेच माक्स न वापरणाऱ्या व्यक्तींना दंडाची कारवाई करण्याचा पवित्रा ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com