
पारनेर | तालुका प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले.हीराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला.
हिराबेन यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. जेष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णा हजारे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सांत्वन करत श्रद्धांजली वाहिली आहे.
अण्णा हजारे यांनी आपल्या शोक संदेश म्हटले आहे, “देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आई श्रीमती हीराबेनजी मोदी यांच्या निधनाची बातमी एकूण मला खूप दुःख झाले. जीवनात आईचे स्थान खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत आयुष्यात आईचा सहवास आहे तोपर्यंत कसलीच कमतरता भासत नाही. पंतप्रधानांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. माताजींना आमच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना करतो.” असे म्हटले आहे .