मोदी व पवार यांची भेट लोकशाहीला धरुनच - ना. थोरात

मोदी व पवार यांची भेट लोकशाहीला धरुनच - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व ज्येष्ठ नेते शरद पवार (NCP Sharad Pawar) यांची भेट (Visite) लोकशाहीला धरुनच आहे. याचा कुठलाही परिणाम राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेवर होणार नाही, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार (NCP MP Sharad Pawar) यांची भेट झाली. या पार्श्‍वभूमीवर ना. थोरात (Minister Thorat) पत्रकारांशी बोलत होते.

ना. थोरात पुढे म्हणाले, शरद पवार (Sharad Pawar) हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची विविध विषयावर भेट घेणे काही गैर नाही. ही लोकशाही आहे. राज्यातील अनेक प्रश्न हे केंद्र सरकारच्या (Central Government) अखत्यारीत मध्ये आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांसह दिल्लीच्या सीमेवर असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये 500 शेतकर्‍यांनी हुतात्मे पत्करले आहे.

नवे कृषी कायदे (New agricultural laws) यामध्ये बदल करणे, याचबरोबर रिझर्व बँकचे सहकारी व नागरी बँकांवर अनेक निर्बंध असून यामुळे या बँक मोडीत निघतील भारतात लोकशाही आहे. त्यामुळे दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते.

या भेटीचा महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नसून दोन वर्षे या सरकारने अत्यंत चांगले काम केले आहे. पुढील तीन वर्षे ही सरकार चांगलेच काम करणार आहे.

काही लोक सरकार कोसळावे यासाठी पाण्यात देव घालून बसले असून दिवसा स्वप्न पाहत आहेत त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असा टोलाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला लगावला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com