पंतप्रधान मोदी यांच्या पॅकेजबाबत उद्योजकांमध्ये नाराजी
सार्वमत

पंतप्रधान मोदी यांच्या पॅकेजबाबत उद्योजकांमध्ये नाराजी

सत्यजित तांबे : भाजपच्या फसव्या घोषणेचा युवक काँग्रेसकडून पर्दाफाश

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून कहा गये वो 20 लाख करोड? हे राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारी आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी लघु व मध्यम उद्योगक्षेत्रातील व्यवसायिकांशी संवाद साधत 20 लाख कोटींच्या पॅकेजमधून काही लाभ मिळाले का? याची माहिती घेतली. यातून छोटे व्यापारी व उद्योजकांना काहीच मिळाले नसल्याने पॅकेजची घोषणा ही पोकळ होती हे स्पष्ट झाले आहे.

या राज्यव्यापी आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन छोटे व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला. जीएसटीमध्ये सूट न मिळाल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज आहे.कर संकलन पूर्वीसारखेच आहे.जे 20 लाख करोड मध्ये कर्ज आहे ते देखील व्याजासकट परत करायचे आहे ते व्याजासकट वसूल केले जाणार आहे.

यात मदत अशी काहीच नाही.कुठल्याही व्यापार्‍याला कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी सरकार आल्यापासून अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. मोदी फक्त घोषणा करतात, मोठमोठे आकडे बोलतात .पण प्रत्यक्षात काही मिळाले असे आजवर कधीच झाले नाही असा उद्योजकांचा एकूण सूर होता.

यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून आणि पत्र लिहून उद्योजकांच्या मागण्या समोर ठेवल्या आहेत. दर दिवशी एका घटकाला भेटून त्यांच्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यात येत आहेत.

पुढील 2 दिवसांत नोकरदारांच्या काय अडचणी आहेत? बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली? याची शहानिशा करून युवक काँग्रेस मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com