पंतप्रधान मोदी ‘डू नॉट डिस्टर्ब मोडवर’

पंतप्रधान मोदी ‘डू नॉट डिस्टर्ब मोडवर’

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची टीका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याला मदत देण्याकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा

आरोप राज्यातीस सत्ताधारी पक्षांकडून होत आहे. त्यात आता प्रदेश युवक काँग्रेसनेही यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोडवर असल्याची टीका केली आहे.

राज्यातील ऑक्सिजनच्या टंचाई संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान कार्यालयाशी अनेकदा संपर्क साधला. मात्र, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या बातम्या येत होत्या. हा संदर्भ घेऊन तांबे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयात संपर्क केल्यानंतर त्यांना पंतप्रधान सध्या डू नॉट डिस्टर्ब मोडवर असल्याचे सांगण्यात येते.

ते केव्हा उपलब्ध होतील, असे विचारले असता पाच राज्यांतील निवडणुका संपल्यावर 2 मे नंतर भेटतील, असे उत्तर त्यांना दिले जाते, असा संवाद ट्विट करून पंतप्रधान करोना नियंत्रणापेक्षा निवडणुकांना जास्त महत्व देत असल्याचा आरोप तांबे यांनी केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com