नगर-मनमाड महामार्गाची साकुरी शिवारात दुर्दशा

महामार्गावर साचले गुडघाभर पाण्याचे तळे साचले
नगर-मनमाड महामार्गाची साकुरी शिवारात दुर्दशा

राहाता | प्रतिनिधी | Rahata

नगर मनमाड महामार्गावर साकुरी शिवारात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या महामार्गावर गुडघाभर पाण्याचे तळे साचले आहे.

तसेच पडलेल्या खड्डयांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहे. या परीसरात एका बाजूचा रस्ता नादुरूस्त झाल्याने ती वाहतूक बंद करन्यात आल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून दुचाकी व पायी जाणाऱ्या नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे गेल्या पंधरा वर्षा नंतर प्रथमच कातनाला नदीला पुर आल्याने राहाता पालिकेचा साठवण बंधारा फुटू नये म्हणून फोडून पाणी खाली सोडन्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com