नगर-मनमाड महामार्गावर खड्डेच खड्डे! जीव धोक्यात घालत रोजचा हजारोंचा प्रवास

नगर-मनमाड महामार्गावर खड्डेच खड्डे! जीव धोक्यात घालत रोजचा हजारोंचा प्रवास

राहुरी l प्रतिनिधी

शिर्डी (Shirdi) व शिंगणापूर (Shani Shinganapur) या दोन आंतरराष्ट्रीय देवस्थानांना जोडणारा व राज्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या नगर-मनमाड महामार्गाची (Nagar-Manmad Highway) अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

मोठ्या प्रमाणात खड्डे वाढल्यामुळे हा महामार्ग साक्षात नरकाचा मार्ग बनला आहे (Pits on Nagar-Manmad Highway). या रस्त्याची वाट लागल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. वाहनांचे नुकसान होत असून मागील महिन्यात राहुरी (Rahuri) तालुक्यात एक महिला आणि दोन तरूणांचा बळी गेला आहे. मात्र या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

या महामार्गावरून आंतरराज्यीय वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच सुमारे आठ साखर कारखान्यांची वाहतूक याच मार्गावरून सुरू असते. अशातच वाळू आणि मुरूमाची बेकायदा वाहतूक सुरू आहे. गेल्या एक वर्षापासून हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या पावसाळी हंगामात तर पुरती वाट लागली आहे.

या रस्त्यावरून जाताना "वाट दिसू दे ग देवा, वाट दिसू दे" अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे नरकयातना भोगण्यासारखे झाले आहे. रात्री तर या रस्त्यावरून जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. हा महामार्ग केव्हा दुरूस्त होईल, देव जाणे, असा संतप्त सूर उमटू लागला आहे...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com