खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक; तरूण ठार

अहमदनगर-सोलापूर महामार्गावरील अपघात
खड्डा चुकविण्याचा प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक; तरूण ठार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ट्रक चालकाने (Truck Driver) महामार्गावरील खड्डा (Pit) चुकविण्याचा प्रयत्नात दुचाकीला धडक (Hit the Bike) दिली. या अपघातात (Accident) योगेश मच्छिंद्र मुरूमकर (वय 30 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) या तरूण ठार (Youth Death) झाला. अहमदनगर- सोलापूर महामार्गावर (Ahmednagar-Solapur Highway) रूईछत्तीशी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. दरम्यान याप्रकरणी अंबादास अंकुश मुरूमकर (वय 24 रा. कोयाळ ता. आष्टी जि. बीड) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

योगेश मुरूमकर हे मंगळवारी सकाळी सहा वाजता त्यांच्या दुचाकीवरून बनपिंप्री (ता. श्रीगोंदे) येथून अहमदनगरच्या दिशेने येत होते. याचवेळी अहमदनगरकडून सोलापूरकडे जाणार्‍या ट्रक चालकाने महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात रूईछत्तीशी (Rui Chhattishi) गावातील जानईवस्तीजवळ दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात योगेश मुरूमकर हे ठार झाले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील वाहने ताब्यात घेतली आहे. याबाबत अंबादास मुरूमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार बी. एम. गांगर्डे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com