राज्यमार्गाच्या खड्ड्यात डांबरीकरणावर मुरूमीकरणाचा लेप दिल्याने नाराजी

राज्यमार्गाच्या खड्ड्यात डांबरीकरणावर मुरूमीकरणाचा लेप दिल्याने नाराजी

हाच मुरूम साईड शोल्डरस्कीपींग करीता वापरा; वाहन चालकांची मागणी

माळवाडगांव |वार्ताहर| Malvadgav

श्रीरामपूर - नेवासा रस्त्यांवर खोकर फाट्यानजीक अपघाती खड्डे बुजविण्याची संभाजी ब्रिगेडने निवेदन देऊन मागणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनाची तातडीने दखल घेतली; परंतू डांबरीकरणावर मुरूमीकरण करून केवळ आंदोलन टाळण्यासाठी केलेली बोळवण असून या राज्यमार्गावर डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याची मागणी संभाजी बिग्रेडने केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, शहराध्यक्ष तुकाराम लबडे, पलाश पाटणी, उत्कर्ष दुधाळ, तन्मय सदावर्ते, स्वप्निल भोसले, संदीप मुठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात निवेदन देवून राज्यमार्गावरील दुरूस्तीची मागणी केली होती.

बांधकाम खात्याने तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने दखल घेत संभाव्य अपघात टाळण्यासाठी पक्के डांबर खडीस मंजूरी येईपर्यंत मुरूम टाकून खड्डे बुजविण्याची व्यवस्था केली; परंतु त्यावर आमचे समाधान होणार नसुन सार्वजनिक बांधकाम खात्याने या राज्य मार्गावरील काही खड्ड्यात टाकलेला मुरूम काढून यावर तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

कारण जोराचा पाऊस आल्यानंतर हा मुरूम लागलीच वाहून गेल्यानंतर एकाच पावसात सर्व खड्डे उघडे पडणार आहेत, त्याच बरोबर परीसरातील विविध संघटनांनी अनेकदा या राज्य मार्गावरील ‘साईड शोल्डर स्कीपींग’ म्हणजेच रोडच्या कडेच्या साईड पट्ट्यावर मुरूम टाकण्याची मागणी केली जात असताना यामागणीकडे गेल्या सार्वजनीक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने अनेकदा वाहनांच्या क्रॉसींग दरम्यान रोडच्या खाली वाहन उतरविण्यास घाबरतात. डांबरीकरणावर मुरूमीकरण करून केवळ आंदोलन टाळण्यासाठी केलेली बोळवण असून या राज्यमार्गावर डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याची मागणी संभाजी बिग्रेडने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com