पिस्तूल दाखवून धमकावले; उंबरेच्या एकावर गुन्हा दाखल

पिस्तूल दाखवून धमकावले; उंबरेच्या एकावर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील उंबरे येथील तरुणाने एकास परवानाधारक रिव्हॉल्व्हर छातीला लावत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र नामदेव ढोकणे असे धमकाविणार्‍याचे नाव आहे.

याप्रकरणी सुनील अण्णा ढोकणे रा. उंबरे, ता. राहुरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजेंद्र ढोकणे याने वादानंतर भांडण गावातील प्रतिष्ठितांकडे मिटविण्याचा प्रयत्न केल्याचा राग आल्याने रिव्हॉल्व्हर आणून तो सुनील ढोकणे यांच्या छातीला लावला. ‘तुला दोन, चार वर्षे निट जगायचे असेल तर जग’.अन्यथा तुला गोळ्या घालून ठार मारून टाकेल, अशी धमकी दिली. शिवीगाळ, दमदाटी करत तक्रारदाराचे वडील अण्णा ढोकणे यांना फोन करून तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुमच्या कुटुंबाची वाट लावेल, अशी धमकी दिली.

याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र ढोकणे विरोधात रिव्हॉल्व्हरचा परवानाधारक गैरउपयोग केल्याप्रकरणासह दमदाटी शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com