पिस्तुलचा धाक दाखवत गोरक्षकांना मारहाण

टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर थरार
पिस्तुलचा धाक दाखवत गोरक्षकांना मारहाण

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणार्‍या टोळीने पिस्तुलचा धाक दाखवून गोरक्षकांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नगर - कल्याण महामार्गावर टाकळीढोकेश्वर परिसरात घडली. या प्रकरणी चार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुनाब बेपारी, फयाज बेपारी, अफसर बेपारी, कासीम बेपारी (रा. सर्व राहणार बेल्हे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी कर्जुलेहर्या येथील गोरक्षक ज्ञानेश्वर विचारे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मंगळवार (दि.8) रात्री जुन्नर येथील एका गोरक्षकाने आळेफाटाकडुन नगरकडे येणार्‍या पिकअप गाडीमध्ये गोवंश जातीचे जनावरांची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. यानंतर विचारे हे मित्रांसह कर्जुलेहर्या शिवारात गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

परंतु ती न थांबता टाकळी ढोकेश्वरकडे निघून गेली. यावेळी सफारी गाडीतून चारजणांनी गोरक्षकांचा पाठलाग केला. गोरक्षक हॉटेल सप्तमीकडे जात असताना त्यांची मोटारसायकल स्लीप होवुन ते खाली पडले. यावेळी सफारतील चौघांनी पिस्तुल दाखवत लोखंडी रॉडने गोरक्षकांना पायावर मारहाण केली. तसेच त्यांची गाडी फोडुन नुकसान केले. दरम्यान इतर गोरक्षकांनी टाकळी ढोकेश्वर टोलनाक्यावर पिकपअ गाडी पकडली. त्याचवेळेस पोलीसही टोलनाक्यावर दाखल झाले त्यांनी पिकअप त्याब्यात घेतली. मात्र, सफारीतील संशयित पळून गेले. यावेळी पिकअपमध्ये एक गाय, एक म्हशीचे पार्डी, एक गीर जातीचा बैल व 25 वासरे दाटीवाटीने कोंबलेले मिळुन आले. गोरक्षकांच्या तक्रारीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com