पाटातून गेलेल्या चारीची पाईपलाईन फुटल्याने घाण पाण्याचे साम्राज्य

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाटातून गेलेल्या चारीची पाईपलाईन फुटल्याने 
घाण पाण्याचे साम्राज्य

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील वॉर्ड नं. 7, राहिंज हॉस्पिटलच्या शेजारीच पाटातून पोटचारी गेली आहे. या चारीतून पाणी जाण्यासाठी पाईप लाईन करण्यात आली होती. मात्र पाईपलाईन फुटल्याने गटारीचे पाणी वर्धमान सोसायटी, राहिंज हॉस्पिटलच्या परिसरात घुसले आहे. त्यामुळे दुर्गंधी येत असून या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तर पालिकेने या चारीतील जुने पाईप काढून त्या ठिकाणी नवीन पाईप लाईन बसवावी, अशी मागणी वर्धमान सोसायटीतील नागरिकांनी केली आहे.

पाटातून काढलेल्या या पोटचारीची अवस्था खुपच बिकट झाली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे वाढली आहेत. या ठिकाणाहून मोठी नाली गेली आहे. पाटातून चारीची पाईपलाईन फुटल्याने पाटाचे पाणी आणि गटारीचे घाण पाणी एकत्र होवून मोठ्या प्रमाणावर घाण पाण्याचे डबके साचले आहेत. त्यात कोणीही घाण आणून टाकत असतात. त्यात भाजीपाला विक्रेतेही मोठ्या प्रमाणावर सडका भाजीपाला याच चारीत टाकत असल्यामुळे घाणीचा वास सुटला आहे. परिसरात हॉस्पिटल आहेत, मोठमोठ्या कॉलनी आहेत, तसेच लहान मुलांची अंगवाडी व शाळा आहेत. त्यामुळे या सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या घाणीच्या साम्राज्याची तक्रार वारंवार पालिकेकडे लेखी निवेदने देवून केली आहे मात्र पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने याबाबतची दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com