पाईपलाईन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

शिवसेनेकडून चौकशीची मागणी || आंदोलनाचा इशारा
पाईपलाईन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील औरंगाबाद रस्ता ते नामदेव चौक ते श्रीराम चौक ते मनमाड रोड या पाईपलाईन रस्त्याचे काम कोट्यवधी रुपये खर्चूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या कामाबाबत माहिती अधिकारात माहिती मागवूनही ती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी मनमानी करत असून केवळ ठेकेदारांची घरे भरण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत या कामाची तपासणी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाईपलाईन रस्त्यासह इतर रस्त्यांच्या कामासंदर्भात माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विक्रम राठोड, गिरीश जाधव, नगरसेवक अमोल येवले, अंबादास शिंदे, स्मिता अष्टेकर आदी उपस्थित होते. पाईलाईन रस्त्याचे 3 कोटी 70 लाख रुपये खर्च करून नुकतेच काम करण्यात आले.

सदरचे काम निविदेतील अंदापत्रकाच्या तरतुदीनुसार झालेले नाही. त्यात प्रचंड तफावत आहे. या कामात जनतेची फसवणूक करत मोठ्या प्रमाणात गैव्यवहार झालेला आहे. या गैव्यवहार प्रकरणी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे कळमकर यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com