पाईपलाईन रोडला चार ठिकाणी घरफोड्या

पाईपलाईन रोडला चार ठिकाणी घरफोड्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरात (Savedi) दिवसेंदिवस चोर्‍या (Thieves), घरफोड्या (Burglary), सोन साखळी चोरीच्या घटना वाढत आहे. चोरट्याच्या टोळीने बुधवारी पहाटे पाईपलाईन रोडवरील (Pipeline Road) दोन मेडीकल (Two medical) व दोन फ्लॅट फोडले.

मात्र, त्याठिकाणी त्यांच्या हाती फार काही लागले नाही. एका मेडिकलमधील रोख रक्कम व इतर साहित्य असा पाच हजार 600 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. मेडिकलचे मालक भारत बाबासाहे घनवट (वय 27 रा. पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police station) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्चभ्रू लोकांची वसाहत असलेल्या सावेडी उपनगर चोरट्याच्या टोळीने लक्ष केले आहे.

काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोडवर (Balikashram Road) पाच ते सहा ठिकाणी घरफोड्या (Burglary) झाल्या होत्या. यानंतर बुधवारी पहाटे पाईपलाईन रोडवर चार ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. बालिकाश्रम व पाईपलाईन रोडवर चोरी करणारी टोळी एकच असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, कोतवाली (Kotwali) व भिंगार पोलीस ठाणे (Bhingar Police Station) हद्दीत देखील याच टोळीने काही घरफोड्या केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान तोफखाना पोलिसांच्या (Topkhana Police) डीबी पथकाला (DB Team) ही टोळी पकडण्यात अद्याप यश आले नाही. या टोळीला अटक करण्याचे आवाहन त्यांच्यासमोर आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com