पाईपलाईन दुरुस्तीसाठी सरपंच सरसावले!

मिरी-तिसगाव योजनेतून तीन गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत
पाईपलाईन दुरुस्तीसाठी सरपंच सरसावले!

करंजी |वार्ताहर| Karanji

पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील करंजी दगडवाडी भोसे (Karnaji, Dagadwadi, bhose) या गावांना मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचा (Miri Tisgaon Regional Pipeline Scheme) पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भोसे गावाजवळ मुख्य पाईपलाईनला लागलेली गळती रोखण्यासाठी या योजनेच्या कर्मचार्‍यांबरोबरच लाभधारक तिन्ही गावचे सरपंचही (Sarpanch) सरसावले. अखेर गुरुवारी सायंकाळी उशिरा ही पाईपलाईन दुरुस्त (Pipeline Repire) करण्यात आली.

जून महिना उलटला तरी पाथर्डी (pathardi) तालुक्यात कुठेही पेरणीयुक्त पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरींनी (Public wells) तळ गाठला आहे. सार्वजनिक विहिरीत पाणी शिल्लक नसल्याने गावात सार्वजनिक नळाद्वारे सोडण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्याचे देखील दिवस वाढविण्यात येत आहेत. करंजी, दगडवाडी, भोसे या गावांना देखील मिरी-तिसगाव योजनेच्या पाण्यात पाण्याची मोठी गरज भासत आहे. भोसे गावाजवळ या योजनेची मुख्य पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे करंजीचे उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे, दगडवाडीचे सरपंच सचिन शिंदे व भोसे गावचे सरपंच विलास टेमकर पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी धावून आले.

गुरुवारी सायंकाळी ही पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. जूनपर्यंत (June) पाणी पुरेल एवढे नियोजन करंजी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले होते. परंतु जूननंतरही पावसाने कुठे हजेरी न लावल्यामुळे करंजी गावाला देखील आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र मिरी-तिसगाव नळ योजनेचे पाणी सुरळीतपणे मिळत राहिले तर करंजीकरांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही, असे उपसरपंच भाऊसाहेब क्षेत्रे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com